Monday, February 27, 2012

'ताईची पिल्लू'

(भाच्चीच्या बारशाला लिहिलेली चारोळी)

अल्लड निरागस अशी बाहुली
ही चिमुकली सर्वांची लाडकी
घेऊन आली आनंदाची ग्वाही
नामकरणाची आता लागली घाई


मधुरा खळतकर

Wednesday, February 22, 2012

'संगीत'









काय असे हे संगीत?
मेळ विविध भावनांचा  
सुरांची जोड कल्पनेला 
रिझवे जो ताल मनाला

हेच असे का ते संगीत?

कधी केवळ स्वरांचे
नसे शब्द तरी बोलणारे
एकांतात विलीन करणारे
कधी एकांत दूर सारणारे

हेच असे का ते संगीत?

कधी रिमझिम पावसात
कधी झुळझुळणाऱ्या वाऱ्यात
कधी पक्ष्यांच्या किलबिलाटात
मायेच्या अंगाई गीतात
हेच असे का ते संगीत?

चिंतामुक्त असे आल्हाददायी
कुणाच्या जीवनाचा आधार
कुणाच्या जीवनाचा अर्थ
परमेश्वराशी जोडते जे नाते

हेच असे का ते संगीत?


मधुरा खळतकर

Friday, February 17, 2012

'परत आज'

परत आज मन excite झालंय
जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीला आतुर झालंय

कुठे भेटायचे केव्हा भेटायचे
अनिश्चित आहे सारे
भेट होणार नक्की
हे जाणतात सारे
परत आज ...

गेल्या दिवसात अनेक वाद
रुसणे फुगणे झाले
विसरून सारे भेटायला
तयार सगळे  झाले
परत आज ...

मिळेल का परत तो आनंद
मिटतील का साऱ्या चिंता
एकमेकांना समजून घेऊ
गैरसमज आता थांबवा
परत आज ...



मधुरा खळतकर


Wednesday, February 15, 2012

‘मैत्री तुझी माझी’

मैत्री तुझी माझी
आहे जगावेगळी

नं कुणाला ती कळली
नं कुणाला ती उमजली
निरंतर संवादाची
मैत्री तुझी माझी

एक हाक हक्काची
एक लाट आनंदाची
आठवते मी तुजला
पाहाते जेव्हा भोवताली


कधी ते रुसवे फुगवे
कधी ती खट्याळ मस्करी 
आठवते मी सगळे
असते जेव्हा एकांत  क्षणी

नाही त्यात व्यवहार कुठले
नाही त्यात औपचारिकता 
आहे निखळ निर्मळ
मैत्री तुझी माझी  

लागो तिला नजर
न होवो कधी निराशा
अशीच राहो निरंतर
मैत्री निरंतर संवादाची

मधुरा खळतकर

'मराठी मुलगा'

मराठी मुलगा...
म्हणाल तर  साधाभोळा, म्हणाल तर चालाख लांडगा
मराठी मुलगा...

कधी असतो तत्वांवर जगणारा
कधी मित्रांसाठी तत्वांना मुरड घालणारा    
मराठी मुलगा...

कधी आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा
कधी प्रेयसीला भेटायचे म्हणून थाप मारणारा
मराठी मुलगा...


असतो मोठी स्वप्ने रंगवणारा
असतो त्यासाठी झटणारा
मराठी मुलगा...

असतो आधुनिकतेच्या दुनियेत जगणारा
तरीही मराठी संस्कृती जपणारा
मराठी मुलगा...

म्हणाल तर  साधाभोळा, म्हणाल तर चालाख लांडगा
मराठी मुलगा...

मधुरा खळतकर

'आईचे मायेचे घास'

आठवतात मला आईचे मायेचे घास 
बसतो जेव्हा मेसच्या बाकावर
कळत नाही मला अजून
काय लिहावे या भावनेवर...

असतात अनेक पदार्थ तिथे
पण नसतो तो ओलावा
कळत नाही मला आज
सांगू हे सर्व कुणाला...

मधुरा खळतकर