Wednesday, February 22, 2012

'संगीत'









काय असे हे संगीत?
मेळ विविध भावनांचा  
सुरांची जोड कल्पनेला 
रिझवे जो ताल मनाला

हेच असे का ते संगीत?

कधी केवळ स्वरांचे
नसे शब्द तरी बोलणारे
एकांतात विलीन करणारे
कधी एकांत दूर सारणारे

हेच असे का ते संगीत?

कधी रिमझिम पावसात
कधी झुळझुळणाऱ्या वाऱ्यात
कधी पक्ष्यांच्या किलबिलाटात
मायेच्या अंगाई गीतात
हेच असे का ते संगीत?

चिंतामुक्त असे आल्हाददायी
कुणाच्या जीवनाचा आधार
कुणाच्या जीवनाचा अर्थ
परमेश्वराशी जोडते जे नाते

हेच असे का ते संगीत?


मधुरा खळतकर

No comments:

Post a Comment